भुसावळचे अनिल चौधरी बच्चू कडूंसोबत गुवाहाटीत दाखल

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |
भुसावळ : राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वर्तुळात घडामोडींना जोरदार वेग आलेला आहे. सर्वत्र चर्चेत आहेत ते फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट. शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गट फोडला असून जवळपास ४० आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
 
 
ac 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे शिंदे यांनी कळविले आहे. दरम्यान बुधवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला असून ते मातोश्रीवर परतले आहे. शिवसैनिक आणि नाराजांनी समोर येऊन सांगितले तर मी राजीनामा देतो असेही भावनिक मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे गटातील एक-एक आमदार फुटत असून आता प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी देखील बच्चू कडूंसोबत गुवाहाटीत दाखल झाले आहे.
 
तसेच आमदारांसाठी गुवाहाटीच्या हॉटेलात टूथ ब्रशपासून कपड्यांपर्यंत सर्व व्यवस्था केली आहे. बाहेर जाण्यास मात्र कोणालाही परवानगी नाही. प्रत्येक आमदार व सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलात स्वतंत्र रुम दिल्या आहेत. त्या ठिकाणी गरजेच्या सर्व वस्तू आहेत. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सूत्रांना दिली आहे.