शिवसेने पाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल ; काँग्रेसची डोकेदुखी वाढली !

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |
मुंबई: एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असताना आता पाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल असल्याचं समोरआलेले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे आता काँग्रेसची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं होतं.
 
 
 

congress
 
 
 
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर आलं. त्यांच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतंही मिळवता आली नव्हती. त्यातच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं. त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावलं होतं. त्यामध्ये पाच आमदार मुंबईत आले नसल्याचं समोर आलं आहे.
 
दरम्यान हे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची संख्या पाच असून ते कोणत्या ठिकाणी आहेत हे कुणालाच माहिती नाही, त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
 
या पाच आमदारांशी काँग्रसच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. उद्या कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून त्या बैठकीला आता हे आमदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.