सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली : सीआरपीएफचे जवान रस्ता बांधणाऱ्या मजुरांना सुरक्षा पुरवत असतांना छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील नौपाडा येथे आज मंगळवारी जवानांवर नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या तीव्र स्वरूपाच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. मृतांमध्ये दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे.
 
 
javan
 
 
ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफची टीम ओरिसाच्या नौपाडा जिल्ह्यात रस्ते बांधणीचे काम करीत असलेल्या लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी निघाली असतांना घडली. वाटेत लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अचानक हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुधारित आणि क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.