दहशतवाद्यांनी उपनिरीक्षकाची घरात घुसून केली हत्या, टार्गेट किलिंग सुरूच…

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक हत्या केली आहे. यावेळी पुलवामामध्ये एका उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी घरात घुसून हे हत्याकांड घडवून आणले. उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, जे घरात उपस्थित होते.दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा गोळ्या झाडलेला मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तुल काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. फारुख अहमद मीर (वय ५०) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पंपोरा येथील लेथपेरा येथे 23 बटालियन IRP मध्ये तैनात होते. त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी आणि तीन मुले – दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
 
 

target killing
 
 
 
 
प्राथमिक तपासातून समोर आले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी फारुख अहमद मीर हे सांबुरा येथील आपल्या घराकडून शेतीकडे गेले होते, तेथे दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली. त्याच्या हृदयाजवळ गोळीसारखी खूण आढळून आली. या हत्येमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरूच
 
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यां पासून टार्गेट किलिंग सुरू आहे. दहशतवादी नागरिकांसोबतच पोलिस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करत आहेत. लष्करही दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहे. काल कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दोघेही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचा कुलगाममधील शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत हात होता.