राज्यसभा निवडणुकीचा अन्वयार्थ!

16 Jun 2022 13:14:20


- श्यामकांत जहागीरदार

 

 राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यातील ४१ जागांसाठी अविरोध निवड झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही १६ जागांसाठीच झाली. या ५७ पैकी भाजपाला २२ तर काँग्रेसला ९ जागा मिळाल्या. भाजपाच्या २५ जागा रिकाम्या झाल्या होत्या; त्यांना २२ जागा मिळाल्या. म्हणजे त्यांना ३ जागा कमी मिळाल्या, तर काँग्रेसच्या सात जागा रिक्त झाल्या होत्या; त्यांना नऊ जागा मिळाल्या. म्हणजे काँग्रेसचा दोन जागांचा फायदा झाला. Rajya Sabha Elections यामुळे राज्यसभेतील भाजपाचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले, तर काँग्रेसचे २९ वरून ३१ झाले. राज्यसभेत भाजपाला स्वबळावर शतक गाठायला आणखी काही महिने लागू शकतात. भाजपाच्या ९२ सदस्यांत ४ नामनियुक्त सदस्यांचाही समावेश आहे. राज्यसभेत नामनियुक्त सदस्यांच्या सात जागा रिक्त आहेत. या जागांवर नियुक्ती केली तर भाजपाचे संख्याबळ ९९ वर पोहोचू शकते. तरीही शतकाला एक जागा कमी पडते. 

 
 
 
rajyasabha

 

 
 
 
रालोआतील मित्रपक्ष पकडून मात्र भाजपाचे संख्याबळ सव्वाशेच्या घरात आहे. Rajya Sabha Elections राज्यसभेत संख्याबळाच्या दृष्टीने भाजपा आणि काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेस तिसऱ्या तर आप आणि द्रमुक संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. तृणमूल काँग्रेसचे १३ तर आप आणि द्रमुकचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस पाचव्या स्थानावर आहे. या दोघांचेही प्रत्येकी ९ सदस्य आहेत. Rajya Sabha Elections शिरोमणी अकाली दलाचा आता एकही सदस्य राज्यसभेत नाही तर बसपाचा फक्त एक सदस्य आहे. आतापर्यंत बसपाचे तीन सदस्य होते; दोन जागा त्यांच्या कमी झाल्या. राज्यसभेच्या १६ जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या, त्यातील सर्वाधिक म्हणजे ६ जागा महाराष्ट्रातील होत्या. राजस्थान आणि कर्नाटकातील प्रत्येकी चार तर हरयाणातील दोन जागांसाठी निवडणूक झाली. Rajya Sabha Elections महाराष्ट्रातील सहापैकी भाजपाला तीन तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली.
 

संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला दोन जागा मिळायला हव्या होत्या, पण भाजपाने तीन जागा जिंकत महाविकास आघाडीवर मात केली. Rajya Sabha Elections राज्यसभा निवडणुकीतील या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेषत: महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर दूरगामी परिणाम होणार आहे. आधीच समन्वयाचा अभाव असलेल्या महाविकास आघाडीतील बिघाडी आता अधिक प्रकर्षाने समोर येणार आहे. Rajya Sabha Elections महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसेही आधी फारसे विश्वासाचे वातावरण नव्हते; आता या पक्षांच्या नेत्यांतील अविश्वास मोठ्या प्रमाणात उफाळून येणार आहे. भाजपाचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. संख्याबळाचा विचार केला तर शिवसेना दोन जागा सहज जिंकू शकत होती, पण गलथान निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयाचा अभाव यामुळे शिवसेनेला ही जागा गमवावी लागली. Rajya Sabha Elections उत्कृष्ट निवडणूक व्यवस्थापन आणि मुत्सद्देगिरीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यावर मात केली.

 

Rajya Sabha Elections राजकारण कसे करावे आणि खेळावे हे आता पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावे लागणार आहे. शरद पवारांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे, तेवढे देवेंद्र फडणवीस यांचे वय आहे. मात्र, तरीसुद्धा अन्य नेत्यांना आपल्या कृतीने वारंवार कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवारांना यावेळी फडणवीस यांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शरद पवार यांचा दबदबा राहात होतो; आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवारांच्या दबदब्याला ओहोटी लागली आहे. पवारांनी राजकारण संन्यास घेण्याची वेळ आली आहे. Rajya Sabha Elections दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कसा वापर करायचा हे ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात असणाऱ्या आणि डझनावारी निवडणुका त्यातही स्वत: राज्यसभेत असणाऱ्या शरद पवारांना समजत नसेल, यावर विश्वास बसत नाही. याचाच अर्थ शिवसेनेला विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी तसेच त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पवारांनी ही खेळी खेळली असावी, असे वाटते. मुळात पवार कधी काय करतील, कसे राजकारण करतील, हे अगदी ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. भाजपाने जास्तीची फक्त एक जागा जिंकली नाही, तर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करून टाकले आहे. Rajya Sabha Elections

 

या निकालाने महाविकास आघाडीसोबत शिवसेनेतही असंतोष उफाळून येणार आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यशैली जबाबदार राहणार आहे. Rajya Sabha Elections एखाद्या व्यक्तीला काही लाख रुपयांची लॉटरी लागावी तसेच त्याने लॉटरीत मिळालेला पैसा काही दिवसात उधळून लावावा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांचे झाले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी त्याची पार माती केली. Rajya Sabha Elections मुख्यमंत्रिपदाचा उपयोग शिवसेनेच्या वाढीसोबत स्वत:ला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरेंना करता आला असता. Rajya Sabha Elections जाता जाता महाराष्ट्राचा थोडाफार विकास केला असता तर उद्धव ठाकरे यांचे नाव महाराष्ट्रातील कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या यादीत घेतले गेले असते. पण आपल्या कर्तृत्वाने ठाकरे यांनी आपले नाव सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट करून टाकले आहे. असे करून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावालाही बट्टा लावला आहे.

 

राज्यसभा निवडणुकीतील या निकालाचे पडसाद २० जूनला होणाऱ्या विधानपरिषदेच्या तसेच मुंंबई महानगरपालिका निवडणुकीवरही होणार आहेत. Rajya Sabha Elections कारण, या निवडणुकीने शिवसेनेने आपला आत्मविश्वास गमावला आहे. हरयाणात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन पराभूत झाल्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. भाजपासमर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी अजय माकन यांचा पराभव केला. Rajya Sabha Elections माकन यांचाही पराभव काँग्रेसच्या गलथान निवडणूक व्यवस्थापनामुळेच झाला आहे. कुलदीप बिष्णोई यांच्या बंडखोरीमुळे व एक मत अवैध ठरल्यामुळे माकन यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. माकन यांच्या पराभवामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणखी वाढणार आहे. शर्मा यांच्या विजयामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मान ताठ झाली आहे.  कारण, राज्यातील दोन्ही जागा त्यांनी भाजपाच्या झोळीत टाकल्या.

 

कर्नाटकात चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने तीन तर काँग्रेसने एक जागा जिंकली. राज्यातून भाजपाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जग्गेश आणि लहरसिंह सिरोया हे तिघे तर काँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले. या निकालाने भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला सात-आठ महिनेच शिल्लक आहेत. राज्यात तसे पाहिले तर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांची आघाडी होती, पण राज्यसभेच्या निवडणुकीने या दोन पक्षातील अंतर वाढवले आहे. Rajya Sabha Elections विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आता दुरावली आहे. यामुळे राज्यातील विधानसभा निवडणूक त्रिकोणी होण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा निश्चितच भाजपाला मिळू शकतो. या निकालाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वजन वाढले असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला आता भाजपा नेतृत्वाची हिरवी झेंडी मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.

 

महाराष्ट्र Maharashtra, हरयाणा Hryana आणि कर्नाटकात Karnataka जे कमावले ते भाजपाने राजस्थानात गमावले आहे. Rajya Sabha Elections राजस्थानातील चारपैकी तीन जागा काँग्रेसने तर एक जागा भाजपाने जिंकली आहे. भाजपासमर्थित अपक्ष उमेदवार सुभाषचंद्रा यांचा पराभव झाला. राजस्थानात काँग्रेसचे मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुर्जेवाला हे तीन उमेदवार विजयी झाले असले, तरी यातील एकही उमेदवार राजस्थानातील Rajsthan नाही तर तिन्ही उमेदवार बाहेरचे आहेत. तिवारी उत्तरप्रदेशचे, वासनिक महाराष्ट्राचे तर सुर्जेवाला हरयाणाचे आहेत. या निकालाने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पक्षातील वजन वाढले असून सचिन पायलट यांच्यासमोर आता काय करायचे, असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. एक मत फुटल्यामुळे भाजपालाही आता राजस्थानातील परिस्थितीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाला एकेका मताची गरज असताना महाराष्ट्र आणि हरयाणाने भाजपाला नियमित मतांव्यतिरिक्त दोन जास्तीची मते मिळवून दिली आहेत, याचे निर्विवाद श्रेय देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis आणि मनोहरलाल खट्टर Manoharlal Khattar यांना द्यावे लागेल.

 
- श्यामकांत जहागीरदार
 

९८८१७१७८१७

Powered By Sangraha 9.0