अलिबागमधील नाट्यगृहाला भीषण आग

    दिनांक : 15-Jun-2022
Total Views |
 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नाट्यगृहाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.
 
 

aag
 
 
 
संध्याकाळी 5 च्या दरम्यान ही आग लागल्याचं सांगितंल जात आहे. या नाट्यगृहात वेल्डिंगचं काम सुरु होतं. या कामादरम्यान ही आग लागल्याचे समजले आहे. . या आगीत सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानीझालेली नाही. मात्र नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं आहे.
 
आगीत नाट्यगृहातील खुर्च्या, छत, साउंड सिस्टीम या आणि अशा विविध वस्तुंचं नुकसान झालेले आहे. . दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.