शिकागोमध्ये भारतीय नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

    दिनांक : 13-Jun-2022
Total Views |

न्यूयॉर्क : शिकागोमध्ये एका भारतीय नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

 
 
 
shikago1

 

 
 
पोलिसांनी याविषयी माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजता शिकागोमधील गॅरी येथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन व्यक्ती जखमी झाले होते. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.
 

पोलिसांच्या माहितीनुसार, एका ३४ वर्षीय व्यक्तीवर नाईटक्लबच्या गेटवर आणि २६ वर्षीय तरुणीला क्लबच्या आतमध्ये गोळीबार करण्यात आला. दोघांनाही स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. चौघे जखमी झाले असून यामधील एकाची स्थिती गंभीर आहे.

 

प्रशासनाने अद्याप पीडितांची कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच गोळीबाराचं नेमकं कारण काय याबद्दलही सांगण्यात आलेलं नाही. या ठिकाणी जास्त गर्दी असल्याने ती कमी करण्यासाठी अनेक यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.