इगतपुरीत थरार घटना ! घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या

    दिनांक : 11-Jun-2022
Total Views |
नाशिक : इगतपुरीत भयानक घटना पाहायला मिळाली. घर जाळून 20 वर्षे तरुणीची हत्या करण्यात आली. अधरवड येथे 10 ते 20 जणांच्या टोळक्याने कातकरी वस्तीतील तीन घरे जाळली. पहाटेच्या सुमाराला कातकरी वस्तीतील थराराने नागरिक भयभीत झाले होते.
 
 

igatpuri
 
 
 
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे.
 
सूत्रांची दिलेल्या माहिती नुसार कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकण्यात आली. यामुळे इगतपुरी तालुक्यातील खळबळ माजली आहे. एका टोळक्याकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारशिंगवे या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आला आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.