केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ; केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

11 Jun 2022 14:14:42


नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असून ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करणार असल्याचे संगणयत येत आहे.

 
 
 

mahagai bhatta 

 

 
 
सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात जवळपास 34000 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता काही वृत्तसंस्थांनी व्यक्त केली आहे.
 

AICPI नुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाईचा भत्ता दिला जावा याचा निर्णय घेतला जातो. AICPI च्या निर्देशांकानुसार, मार्च 2022 पासून महागाईत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

 

केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 39 टक्के इतका होणार. केंद्र सरकाकडून दरवर्षी दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ केली जाते. साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. वर्ष 2022 च्या सुरुवातीचला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महागाई निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Powered By Sangraha 9.0