मुस्लीम डॉक्टरचा आदर्श ; राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करणार 90 लाखाची संपत्ती, वाचा सविस्तर

07 May 2022 13:35:38
लखनऊ: मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका मुस्लीम कुटुंबाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 90 लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता सुपूर्द करण्याची घोषणा केली आहे.
 
यामागे त्यांचा हाच उद्देश आहे कि, जेणेकरून देशातील मुस्लीम समाजात संदेश पोहोचेल की मुस्लिमांना अयोध्या आणि भगवा आवडतो.
 
 
 
dr
 
 
 
सविस्तर -
 
शहरातील खालापार येथील रहिवासी असलेले डॉ. मोहम्मद समर गझनी यांनी त्यांची सुमारे ९० लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे राम मंदिराच्या बांधकामासाठी सुपूर्द करायची आहे असे जाहीर केले. . जेणेकरून ही मालमत्ता विकून त्याचा पैसा राम मंदिराच्या उभारणीसाठी वापरता येईल (Muslim Man will Donate 90 Lakhs Property for Ram Temple).
 
ते म्हणाले की, आम्ही ईदच्या नमाजमध्ये परिधान केलेल्या भगव्या कपड्यांचा उद्देश संपूर्ण देशाला हा संदेश देण्याचा होता की मुख्यमंत्री योगींच्या कपड्यांचा भगवा रंग कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा हिंदू मुस्लिमांच्या विरोधात नाही. भगवा हा गुंडांच्या विरोधात आहे, याच भगव्या रंगाला उत्तर प्रदेश हे विशेष राज्य बनवायचं आहे. ज्याची भारताच्या इतिहासात नोंद व्हावी. गझनी हे भाजप अल्पसंख्याक समाज मोर्चाचे माजी राज्यमंत्री राहिले आहेत. भाजपप्रेम आणि योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी आपली मालमत्ता राममंदिरासाठी (Ayodhya Ram Temple) दान करण्याची घोषणा केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे माझी वैयक्तिक मालमत्ता सोपवायची आहे, असं गझनी यांनी सांगितलं.
 
त्यांची अशी इच्छा आहे, की ही संपत्ती विकून याचे पैसे राम मंदिराच्या उभारणीत वापरावे आणि संपूर्ण देशातील मुस्लिमांना एक संदेश पोहचावा की मुस्लीम अयोध्येवर प्रेम करतात आणि भगव्याचा द्वेष करत नाहीत. तसंच 2024 मध्ये मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उभा राहावा. . मुख्यमंत्री योगी हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत, ते फक्त गुन्हेगार आणि माफियांच्या विरोधात असल्याचंही गझनी म्हणाले.
 
ज्यांनी राज्याला उच्च स्थानावर नेलं त्यांना खर्‍या अर्थाने रामराज्य आणायचं आहे. ज्यासाठी हिंदू-मुस्लिमांनाही पुढे यावं लागेल आणि एकमेकांची गळाभेट घ्यावी लागेल.ते म्हणाले की १५ मेपासून आम्ही प्रत्येक घरात जाऊन हा संदेश देणार की सीएम योगींसोबत या आणि मैत्रीचा हात पुढे करा.
Powered By Sangraha 9.0