शहाद्यात मनसेतर्फे हनुमान चालिसा पठण

07 May 2022 18:52:30
शहादा : राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात हनुमान चालिसा पठण करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रेस मारुती मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते करण्यात आली.
 
 
mns 
 
 
 
यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष रोहित खैरनार, तालुका सचिव अमेय राजहंस, कृष्णा बढे, दीपक लोहार, योगेश सोनार, दीपक लोहार, अक्षय सोनार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Powered By Sangraha 9.0