सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उद्या अमळनेरात

06 May 2022 21:25:39
अमळनेर : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे शनिवार ७ मे रोजी अमळनेर दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत सकाळी ९.३० वा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच मतदारसंघातील इंधवे ता.पारोळा येथे सकाळी ११ वा. संवाद मेळावा होणार आहे.
 
 
 
dhan 
 
 
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजी खा. ईश्वरलाल जैन, माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील, माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ. गुरुमुख जगवाणी, माजी आ. मनीष जैन, माजी आ. राजीव देशमुख, माजी.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आ. दिलीप वाघ, माजी आ. कैलास पाटील, माजी आ. अरुण पाटील,माजी आ. दिलीप सोनवणे, भुसावळचे माजी आ. संतोष चौधरी, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस हाजी एजाज ,शेंदुर्णीचे संजय गरुड, संजय पवार, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणीताई खडसे, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, प्रवक्ते योगेश देसले, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, रिताताई बाविस्कर, तिलोत्तमाताई पाटील, शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, भूषण भदाणे उपस्थित राहणार आहेत.
 
उद्घाटन सोहळा व संवाद मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, पारोळा पं.स.च्या माजी सभापती छायाबाई पाटील, प्रकाश जाधव, जि.प.सदस्य हिंमत पाटील, पारोळा पं.स.चे माजी उपसभापती अशोक पाटील, महिला शहराध्यक्ष अलका पवार, अमळनेर पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनिल शिंपी, राष्ट्रवादी विद्यार्थी माजी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, माजी विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहराध्यक्ष सनी गायकवाडांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0