जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये काश्मिरी पंडिताची हत्या

31 May 2022 12:04:16
 श्रीनगर : जम्मू-काश्मीर येथील कुलगाममध्ये काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेरलं असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.
 
 

dahashadwadi
 
 
 
 
मृतक महिला शिक्षिकेचं नाव रजनी असल्याची माहिती समोर आली आहे. रजनी या सांबा येथील निवासी होत्या आणि कुलगाम गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये शिक्षिकेचं काम करत होत्या.
Powered By Sangraha 9.0