मुक्ताईनगर : तालुक्यातील अतुर्ली येथील पोलीस पाटील यांचा मुलगा प्रफुल्ल मेढे याने पश्चिम बंगाल येथे झालेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जूनियर स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. यासाठी प्रफुल्लला बास एस गोस्वामी सर( मुंबई ) व त्याचे बीएसएफ जवान काका रामू श्रीपत मेढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रफुल्ल मेढे याने २२ ते २७ मे २०२२ हावडा पश्चिम बंगाल या कालावधीत चालू असलेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जूनियर ६२ ते ६९ किलो वजन गटात १०२.५ किलो वजन उचलून बेंचप्रेस स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. महाराष्ट्र संघात प्रफुल्ल मेढे यांचे निवड करण्यात आली होती. त्याच्या या कामगिरीने ग्रामवासीयांकडून त्याचे अभिनंदन केले गेले.