महिलांना रात्री ७ नंतर कामाची बळजबरी करता येणार नाही

29 May 2022 19:26:23
लखनऊ : महिलांच्या रात्रपाळी कामाबाबत उत्तरप्रदेश सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून आता मात्र कोणत्याही महिलेला संध्याकाळी सात नंतर काम करायची सक्ती करता येणार नाही. ज्या महिला सायंकाळी सातच्या नंतर काम करण्यास सहमत असतील त्यांच्यासाठी वाहतुकीच्या सेवा पुरवण्यात याव्यात असे आदेश उत्तरप्रदेश सरकारने दिले आहेत.
 
 
 lady
 
 
राज्यात बहुतांश महिला कामगार या रात्रपाळी कामे करतात. महिला वर्गास रात्रीपाळीच्या कामाने अडचण यायला नको यासाठी उत्तरप्रदेश सरकारने नवा नियम लागू केलेला आहे. महिलांच्या लेखी परवानगी नंतर त्या रात्रपाळीत काम करू शकतात. अशा महिलांना जेवण आणि वाहतूक व्यवस्था कंपनीने पुरवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0