जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळल्याने ७ जवान जागीच ठार

27 May 2022 17:16:13
 
लडाख : भारतीय लष्कराचे २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडून या अपघातात सात जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात लष्कर सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला. ही दुर्घटना कळताच मदतीसाठी लेह येथून सर्जिकल टीमला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित केले गेले.
 
ladakh 
 
 
२६ जवानांचे पथक परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उप-सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड एरियाकडे जात होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले. गंभीर जखमी जवानांच्या हवाई दलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते. 
लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. इतर जवानही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हवाई मार्गाने हलवण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0