४८ तासात मान्सून केरळात दाखल होणार

26 May 2022 17:29:02
केरळ : मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने उद्या २७ मे रोजी केरळात मान्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यावर्षी वेळेपूर्वीच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
 
 
rain 
 
 
नैऋत्येकडून मान्सून पुढे येत असून अरबी समुद्राच्या काही भागात तसेच मालदीव, कोमोरिन क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तो पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील ४८ तास दक्षिण अरबी समुद्र, कोमोरिनचा काही भाग आणि संपूर्ण मालदीव, लक्षद्वीप बेटाच्या लगतच्या भागांवर मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
 
यंदा ९९ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईचे आयएमडी च्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0