आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्याने जम्मू काश्मीर पुन्हा एकदा हादरले

24 May 2022 20:02:16
श्रीनगर : सद्य परिस्थितीत भ्याड हल्ल्यांच्या पुनरावृत्तीच्या घटनेत वाढ होत असून आजच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात पोलीस कर्मचारी शहीद झाला असून त्यांची चिमुकली मुलगी या हल्ल्यात जखमी झालेली आहे. दहशतवाद्यांनी रुग्णालयात शिरुन पोलीस कर्माचऱ्यावर गोळी झाडली. सैफुल्ला कादरी हे दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
 
 
shri nagar
 
 
यापूर्वी श्रीनगरच्या अली जान रोड स्थित ऐवा ब्रिज येथे दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य केलं होतं. पोलीस कर्मचारी गुलाम हसन डार यांच्यावर गोळी झाडली होती. सुदैवानं ते बचावले. पण ते गंभीर स्वरुपात जखमी झाले. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0