राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची मोठी योजना ; या राज्यात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी

23 May 2022 17:05:50
उत्तर प्रदेश : राज्यातील पर्यटन स्थळांना आता हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेद्वारे जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आता लवकरच आग्रा ते मथुरा दरम्यान 'हेली टॅक्सी' सेवा सुरू होऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर पर्यटकांना आग्रा-मथुरा दरम्यान हेलिकॉप्टरने प्रवास करू शकता.
 
 
 
taxi
 
 
 
पीपीपी मॉडेलवर हेलिपॅड सुरू करण्यात येणार
 
उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा हेलिपॅड PPP (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तत्त्वावर बांधले जातील. सर्वात कमी बोली लावणाऱ्याला हेलिपॅड बांधण्याबरोबरच ऑपरेशन आणि देखभालीचे देखील काम दिले जाईल.
 
यूपी सरकारने संचालन आणि देखभालीसाठी मागवल्या निविदा
 
उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे बांधकाम निविदा, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. या संदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यात सांगितले की, प्री-बिड 31 मे रोजी दुपारी 12 वाजता पर्यटन विभाग, लखनौच्या कार्यालयात होईल. तसेच, आरएफक्यू सबमिट करण्याची तारीख 23 जून निश्चित करण्यात आली आहे.

कंपन्या या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात
 
रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (RFQs) साठी अर्ज आवश्यक शुल्कासह https://etender.up.nic.in वर 23 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात. निविदेतील कोणतेही बदल (असल्यास) संबंधित माहिती https://etender.up.nic.in आणि uptourism.gov.in या वेबसाइटवर दिली जाईल.
 
आग्रा ते मथुरा प्रवास होईल काही मिनिटांत पूर्ण
 
हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यानंतर आग्रा ते मथुरा दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून, पर्यटक एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतील. यासोबतच पर्यटनाला चालना मिळणार आहे. याआधी पर्यटन विभागाने गोवर्धन परिक्रमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला होता.
Powered By Sangraha 9.0