'पुणे मेट्रोमॅन' शशिकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

20 May 2022 14:53:13
पुणे : मेट्रोमॅन म्हणून ओळख असणारे पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्प सल्लागार शशिकांत लिमये यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती. पुणे लोहमार्गाचे विस्तारीकरण बाबतचे आराखडे त्यांनी तयार केले होते.
 


Matro Man 
 
 
मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत दोन दिवसांपूर्वी महामेट्रोने घेतलेल्या बैठकीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. काल गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी शशिकांत लिमये यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
Powered By Sangraha 9.0