रजेवर गेलेल्या जवानांच्या सामानात सापडला हातबॉम्ब ; श्रीनगर विमान तळावरील घटना

    दिनांक : 02-May-2022
Total Views |
जम्मू : श्रीनगर विमानतळावर रजेवर गेलेल्या एका जवानाला त्याच्या सामानात हातबॉम्ब सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सैनिकाला ताब्यात घेण्यात आले.

grened
 
 
 
खरं तर, जवान सुट्टीवर आपल्या घरी जात होता, विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचे सामान तपासले, तेव्हा त्याच्या सामानातून एक हँडग्रेनेड सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा ग्रेनेड त्याच्या सामानात कसा आला याची चौकशी केली जात आहे.
 
अटक करण्यात आलेले लष्कराचे जवान 42RR बटालियनमध्ये तैनात आहेत. लष्करी जवान बालाजी संपत हे केके नगर थोरापडी, वेल्लोर तामिळनाडू येथील रहिवासी आहेत.पोलिसांनी तातडीने जवानाला ताब्यात घेतले. त्यानंतर जवानाला पोलीस चौकी हुम्हामा येथे नेण्यात आले, तेथे त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची पुष्टी करताना पोलिसांनी सांगितले की, सकाळी 09.30 च्या सुमारास बॅगेज Grenade seized स्क्रीनिंग दरम्यान विमानतळावरील ड्रॉप गेटवर लष्कराचा जवान पकडला गेला.