त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री माणिक साहा

    दिनांक : 14-May-2022
Total Views |

त्रिपुरा : बिप्लब देब यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने माणिक साहा यांना त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावांची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळालेला असून सर्व नेत्यांनी साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता ते लवकरच शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील.
 
 
manik
 
 
यापूर्वी शुक्रवारी 13 मे रोजी बिप्लब देब यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. या बैठकीच्या 24 तासांनंतर आज 14 मे रोजी त्यांनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देखील सादर केला. राजीनामा दिल्यानंतर बिप्लब देब यांनी हायकमांडच्या सांगण्यावरूनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर पक्ष आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे आणि पक्षाकडून जी काही जबाबदारी मिळेल, ती आपण पार स्वीकारू, असेही ते यावेळी म्हणाले.