जम्मूत बसला भीषण आग, 22 प्रवासी भाजले, 3 जणांची प्रकृती गंभीर

13 May 2022 18:40:17
श्रीनगर : आज दुपारी कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या लोकल बसला आग लागली. बस कटरापासून 1.5 किमी अंतरावर असलेल्या खरमलजवळ पोहोचली होती, तेव्हा बसमध्ये स्फोटाचा आवाज आला. हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू , 22 प्रवासी भाजले असून यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
 
 
fire bus
 
 
 
सदर घटनेची माहिती कळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसच्या इंजिनमध्ये स्फोट झाल्यावर बसने पेट घेतला. आग तीव्र स्वरूपाची असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती केले असून आगीच्या कारणाचे तपासकार्य सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0