युक्रेनच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तान आले एकत्र

13 May 2022 11:05:31
नवी दिल्ली : युक्रेनच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तान एकत्र आले आहे. युक्रेनमधील रशियन आक्रमणामुळे उद्भवलेल्या संकटाला संबोधित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ठरावावर मतदान घेण्यात आले. मात्र या मतदानात भारतासह पाकिस्ताननेही भाग न घेता तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. माहितीनुसार, १२ देशांनी या मतदानात भाग घेलेला नाही. त 47 सदस्यीय मंडळात ठरावाच्या विरोधात मतदान करणारे चीन आणि इरिट्रिया हे दोनच देश आहेत.
 
 

india
 
 
 
 
युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात यूएनमध्ये रशियाच्या विरोधात आणलेल्या ठरावांवर भारताने यापूर्वी मतदान करणे टाळले होते. मतदानपूर्वी भारताने Indo-Pak पुन्हा एकदा चर्चेत भाग घेत युक्रेनमधील लोकांच्या मानवी हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याचे आवाहन केले आणि "मानवी हक्कांच्या जागतिक संवर्धन आणि संरक्षणासाठी वचनबद्धतेचा" पुनरुच्चार केला.
 
युक्रेनच्या कीव, खार्किव, चेर्निहाइव्ह आणि सुमी शहरांमध्ये रशियाने केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी आधीच स्थापन केलेल्या चौकशी आयोगासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावात अतिरिक्त आदेशाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रस्तावाच्या बाजूने ३३ मते पडल्याने तो मंजूर करण्यात आला. या ठरावात रशियाने आंतरराष्ट्रीय एजन्सींना युद्धग्रस्त भागातून "स्थानांतरित" झालेल्या आणि रशियन प्रदेशात वास्तव्य करणार्‍या लोकांना विना अडथळा प्रवेश प्रदान करण्याचे आवाहन केले. मॉस्कोचा असा दावा आहे की हे लोक त्यांच्या स्वेच्छेने रशियात दाखल झाले.
 
 
Powered By Sangraha 9.0