स्वामी विवेकानंद विमानतळावरून हेलिकॉप्टरवर उड्डाणाच्या सरावा दरम्यान हेलिकॉप्टरला मोठा अपघात ; दोन पायलट ठार

13 May 2022 11:21:23
रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावरून छत्तीसगड हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
 

accident 
 
 
 
वास्तविक, विमानतळावर सरकारी हेलिकॉप्टरला अपघात झाला असून, त्यात पायलट आणि सहवैमानिकाचा मृत्यू झाला आहे. सध्या विमानतळाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव अशी त्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या कॅप्टन पांडा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
माहितीनुसार, विवेकानंद विमानतळावर धावपट्टीपासून दूर टॅक्सीवेजवळ रात्री 9 ते 10च्या सुमारास हा अपघात Helicopter crash झाला. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव हेलिकॉप्टरवर उड्डाणाचा सराव करत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर नेहमीच्या प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत.
 
हेलिकॉप्टर अपघाताबाबत राज्य सरकारकडून अधिकृत निवेदन आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी डीजीसीए आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सविस्तर तांत्रिक चौकशी केली जाईल. त्याचवेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मृत वैमानिकाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आदेश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0