भीलवाडा येथे 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या ; राजस्थानच्या भिलवाडामध्ये पुन्हा दंगा... इंटरनेट सेवा बंद

11 May 2022 10:40:43
जयपूर : राजस्थानमधील भीलवाडा येथे 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर भाजप, हिंदू जागरण मंच आणि विश्व हिंदू परिषदेने आज भिलवाडामध्ये बंदची हाक दिली आहे.

danga 
 
 
पुढे आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शास्त्रीनगर येथील ब्राह्मणी स्वीट्समध्ये पैशांवरून काही लोकांमध्ये वाद झाला होता. रात्री काही लोकांनी २२ वर्षीय आदर्श तापडियाची चाकूने भोसकून हत्या केली. गंभीर जखमी आदर्शला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने 11 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून येथील इंटरनेट 24 तासांसाठी बंद केले असून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.
 
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने येथील इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद केली आहे.माहितीनुसार, येथील एका तरुणाची इतर समाजातील लोकांनी भोसकून हत्या केली होती, त्यानंतर परिसरात तणाव वाढला होता ही घटना भीलवाडा शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात घडली.
Powered By Sangraha 9.0