श्रीलंकेत उफाळला तीव्र हिंसाचार

    दिनांक : 10-May-2022
Total Views |
श्रीलंका : श्रीलंकेत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा देशभर संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिल्यानंतर सर्वत्र हिंसक घटना घडत असून सद्य परिस्थितीत देशात प्रचंड प्रमाणात जाळपोळ झालेली आहे. राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर तीव्र चकमकी सुरू आहेत.
 
 
 
 
shrilanka
 
 
राजधानी कोलंबोमध्ये सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठिंबा दिल्यावर परिस्थिती अधिक चिघळली आहे. नागरिकांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदार, मंत्र्यांसह अन्य नेत्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ती अथुकोराला यांनी सोमवारी प्रथम सरकारविरोधी निदर्शकांवर गोळीबार केला आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली. कोलंबोच्या हद्दीत हा अपघात झाला.