नाशिकचे झाकीर हुसेन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत

    दिनांक : 29-Apr-2022
Total Views |
कोरोना काळात ऑक्सिजन गळतीनं 22 रुग्णांचा गेले होते जीव
 
नाशिक : कोरोना काळात राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (dr zakir hussain hospital) ऑक्सिजनच्या (Oxygen) टँकमध्ये गळती झाल्याची त ही अत्यंत दुर्देवी घटना घडली होती. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकमधलं तेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल असतानाही चक्क चित्रपटाच्या शुटिंगसाठी परवानगी देण्यात आली होती.धक्कादायक प्रकारचे फोटोही समोर आले आहेत.
 
zakir 
 
 
नाशिक महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडून कर्मचारी चक्क दारु पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे.
 
रात्रीच्या वेळी कर्मचारी रुग्णांना वाऱ्यावर सोडून इमर्जन्सी वॉर्डमध्ये दारू पीत बसले होते. रात्री अकरा ते चारपर्यंत चालणाऱ्या या शूटिंगमुळे रुग्णांना आवाजाचा आणि गोंधळाचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. एका बाजूला चित्रपट शूटिंगचा गोंधळ तर दुसऱ्या बाजूला दारू पार्टी करत कर्मचाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा केल्याचा समोर आला आहे.
 
रुग्णालयातील काही कर्मचारी चित्रपटाचं शूटिंग बघण्यात व्यस्त होते, तर काही कर्मचाऱ्यांची दारू पार्टी रंगली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
 
दरम्यान, तक्रारी आल्यानंतर रुग्णालयातील CCTV तपासून कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असं रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितलं आहे.