अनोळखी मयत पुरुषांची ओळख पटविण्याचे आवाहन

28 Apr 2022 20:21:48
नंदुरबार : एक अज्ञात अनोळखी पुरुष बेडकी शिवारात नवापूर ते सुरत रेल्वे लाईनवरील इलेक्ट्रॉनिक पोल क्रमांक ९५/०३ जवळ रेल्वे ट्रॅकवर फिरत असतांना रेल्वेने धडक दिल्याने डोक्यास, तोडांवर, दोन्ही पायाच्या गुडग्यावर दुखापत होवून मयत झाला आहे.
 
 
cr
 
मृतदेहाची उंची ५ फुट, वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष,नाव गाव माहित नाही, वर्ण सावळा, केस काळे वाढलेले. पेहराव कमरेच्या खाली मळकट रुमाल असे वर्णन आहे. सदर अनोळखी मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वारस मिळून आलेले नाहीत. तरी सदर अनोळखी पुरुषाबाबत काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक, नवापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे सहायक पोलीस निरीक्षक,नवापूर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Powered By Sangraha 9.0