खेलो इंडिया आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेर संघ विजयी

26 Apr 2022 19:28:14
बंगळुरू : जैन विद्यापीठ मध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेर येथील व्ही एस नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्रतिनिधित्व करून १ सुवर्ण, तर २ रौप्य पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले. अभिमानास्पद बाब म्हणजे प्रथम खेलो इंडिया स्पर्धेत गोविंदा महाजन ह्याने सुवर्ण पदक पटकावले असून आता पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
 

khelo 
 
गोविंदा महाजन याने २५२ किलो वजन उचलून सुवर्ण पदक आणि उदय महाजन याने २२७ किलो वजन उचलून व किरण मराठे याने २७७ किलो वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली. विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संजय भावसार, प्रा.क्रांती क्षीरसागर, संघ प्रशिक्षक म्हणून प्रा.उमेश पाटील, प्रशिक्षक म्हणून योगेश महाजन यांनी मार्गदर्शन केले.
 
आजपर्यंत नाईक महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंगच्या विविध स्पर्धांमध्ये एकूण १० पदके पटकावली आहेत. खेलो इंडिया या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.
Powered By Sangraha 9.0