साडेतीन एकर ऊस आगीत जळून खाक

    दिनांक : 16-Apr-2022
Total Views |
जळगाव : चोपडा तालुक्यातील गरताड शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना १५ राेजी दुपारी घडली. विश्वनाथ पाटील यांच्या शेतात गट क्रमांक ३/२ क्षेत्रात साडेतीन एकर ऊस लावला. या उसाला दुपारी दीड वाजता अचानक विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली.
 
 
 
 
जळलेला ऊस
 
 
 
 
या आगीत साडेतीन एकर सर्व ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या आगीची माहिती शेतकरी विश्वनाथ पाटील यांना चोसाकाचे कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांना कळवली. भरपाईची मागणी केली जात आहे.