पाकिस्तानात रस्ता ते संसदेपर्यंत भारताचाच उदोउदो

-दिवंगत पंतप्रधान वाजपेयी, पंतप्रधान मोदी यांचीही चर्चा

    दिनांक : 10-Apr-2022
Total Views |

इस्लामाबाद : सध्याच्या घडीला शेजारच्या पाकिस्तानात अगदी गल्लोगल्ली ते थेट संसदेपर्यंत जगातील एकमेव India भारताचाच उदोउदो सुरू आहे.


Imran Khan 
 

याशिवाय दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चर्चा सुरू आहे. वायपेयी सरकारने लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी संसदेतील विश्वासमत प्रस्तावाचा मान राखला होता, तर सध्या मोदी सरकारने जगभरात भारतीय लोकशाही प्रणालीचे वर्चस्व निर्माण केले आहे आणि याचीच आठवण पाकिस्तानातील नागरिकांनी देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना करून दिल्याचे पाहावयास मिळते.

 

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. सत्ता गमावण्याची वेळ आली असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेकदा India भारताचे कौतुक केले आहे. India भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याचे स्पष्ट करत हा देश स्वाभिमानी व प्रामणिक असून, जगातील कोणतीही मोठी शक्ती भारतावर वर्चस्व गाजवू शकत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. याशिवाय इम्रान खान यांचे जवळचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांनीही संसदेत आपल्या सरकारची बाजू राखत भारताचे कौतुक केले. आजच्या स्थितीत जगभरात भारताचा शब्द प्रमाण मानला जात आहे. अमेरिकेने दबावतंत्र वापरले असतानाही India भारत रशियाकडून पेट्रोलियम इंधनाची खरेदी करत आहे. त्याचवेळी त्यांचे अमेरिकेसोबत देखील चांगले संबंध आहेत. आणि हे सर्व स्वतंत्र अशा परराष्ट्र धोरणामुळेच शक्य असल्याचे कुरेशी म्हणाले होते.

 

वाजपेयी सरकारची देखील चर्चा

पंतप्रधान इम्रान खान मात्र अद्याप सत्तेलाच चिटकून बसले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी समाज माध्यमातून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी 31 मे 1996 रोजी संसदेत दिलेल्या भाषणाचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहे. इम्रान खान जर भारताला आदर्श मानत असतील तर त्यांनी भारतीय नेत्यांपासून काही शिकावे, असा टोला तेथील नागरिकांनी हाणला आहे. तत्कालीन वाजपेयी सरकार केवळ एका मताने विश्वासमत प्रस्ताव हरले होते आणि 13 दिवसांतच अटलबिहारी वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

 

मोदी सरकारही ...

पाकिस्तानात PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही जोरदार चर्चा आहे. इम्रान खान यांनी India भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केल्याने व भारताचा 'एक स्वाभिमानी देश' असा उल्लेख केल्याने तेथील विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इम्रान खान यांना भारत इतका चांगला वाटत आहे, तर त्यांनी भारतात निघून जावे, असाही सल्ला दिला जात आहे. यावर शाह महमूद कुरेशी यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मित्रत्वाचे संबंध असल्याचे म्हटले होते. मोदींनी लाहोरला भेट दिली. परंतु, शरीफ भारतात का नाही गेले, असाही प्रश्न उपस्थित केला होता.