रशिन सैन्याकडून पुतीन यांची फसवणूक?

31 Mar 2022 16:19:20

वॉशिंगटन : रशियानं युक्रेनवर हल्ला करून आता जवळपास दीड महिना होत आला आहे. अश्यातच व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क संचालक केट बेडिंगफील्ड यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

"आमच्याकडे माहिती आली आहे की पुतिन यांची रशियन लष्कराकडून फसवणूक केली जात आहे. याच कारणामुळे पुतिन आणि त्यांच्या लष्करामध्ये सातत्याने तणाव वाढू लागला आहे", असं केट म्हणाल्या.

putin 

 

दरम्यान, रशियन Russian लष्कराची कामगिरी ढिसाळ होत असतानाही त्याबाबत पुतीन यांना चुकीची माहिती दिली जात असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. "आम्हाला खात्री आहे की रशियन लष्कर कशी खराब कामगिरी करत आहे आणि आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था कशी ढासळत आहे याविषयी त्यांच्या सल्लागारांकडून त्यांना योग्य ती माहिती दिली जात नाहीये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे सल्लागार देखील त्यांना सत्य परिस्थिती सांगायला घाबरतात", असं केट बेडिंगफील्ड म्हणाल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे वाढत्या दबावामुळे रशिया लवकरच युद्धबंदीची घोषणा करू शकते, असं सांगितलं जात आहे. युक्रेनला वाढता पाठिंबा आणि बड्या देशांकडून होणारी लष्करी, आर्थिक मदत पाहाता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून रशियावर टाकण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ती वेळ टाळता येऊ शकते, असं आंतरराष्ट्रीय संबंधातील जाणकारांचं मत आहे.
Powered By Sangraha 9.0