एलआयसी आयपीओ पुढच्या वर्षी?

03 Mar 2022 17:02:35
मुंबई : रशिया -युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेमुळे भांडवल बाजार सध्या मोठ्या उलथापालथीचा समोर जात आहे. अशा या वातावरणात एलआयसीच्या आयपीओ बाजारात आणल्यास अपेक्षित फायदा होईल का? या शंकेने हा आयपीओ थेट पुढच्याच वर्षी बाजारात आणला जाण्याची शक्यता आहे.भारतीय अर्थमंत्रालय या बाबतीत विचार करत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
LIC IPO
 
भारत सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून ७८ हजार कोटी मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यातील ६५ हजार कोटी हे एलआयसी आयपीओ मधून मिळवण्याचा सरकारचा इरादा आहे. या रकमेचे उद्दिष्ट गाठले गेले नाही तर सरकारच्या नियोजनास त्यामुळे फटका बसू शकतो यामुळेच यावर पुनर्विचार सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0