आता वहिनींचे भाऊजी घेऊन येणार ११ लाखांची पैठणी !

    दिनांक : 28-Mar-2022
Total Views |
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय शोपैकी होम मिनिस्टर (homeminister ) हा एक शो आहे. सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हा शो होस्ट करताना दिसतात. गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे.
 

aadesh 
 
 
आदेश बांदेकर (aadesh bandekar) वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता या शोमध्ये मोठा बदल होणार आहे. नावापासून ते पैठणीपर्यंत सर्वंच नवीन असणार आहे.
 
आता गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी मिळणार आहे. येत्या 11 एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो 'महामिनिस्टर' या पर्वात बदलणार आहे. गृहिणी या नवीन पर्वासाठी मात्र खूपच उत्सुक आहेत. महामिनिस्टरच्या नवीन पर्वाचा पहिला वहिला प्रोमो देखील चांगलाच चर्चेत आला आहे.
 
या प्रोमोमध्ये सुचित्रा आदेश बांदेकर (suchitra bandekar) यांच्यासोबत वाद घालताना दिसते आहे. गेल्या 18 वर्षात 5000 गृहिणींना पैठणी देऊन सन्मानित केले, मात्र मला एकही पैठणी तुम्हाला द्यावीशी नाही वाटली? आणि आता तर काय महामिनिस्टर घेऊन जाणार 11 लाखांची पैठणी...आता मला बॅग भरायला सांगाच तुम्ही.. असं सुचित्रा बांदेकर रागाता म्हणत असताना दिसत आहेत. यावेळी आदेश बांदेकर यांनी गप्पा राहणं पसंत केलं आहे. त्यांचा हा प्रोमो व्हिडिओ प्रेक्षकांना मात्र प्रचंड आवडलेला आहे.