अफगाणिस्तानमध्ये स्त्री-पुरुष भेद करण्यास सुरूवात ; स्त्री-पुरुषांना बागेत फिरण्यावर बंदी

    दिनांक : 28-Mar-2022
Total Views |
अफगाणिस्तानमध्ये स्त्री-पुरुष भेद करण्यास सुरूवात ; स्त्री-पुरुषांना बागेत फिरण्यावर बंदी
काबुल : अफगाणिस्तानवर  सत्ता मिळवल्यानंतर आता तालिबानने स्त्री पुरुष असा भेद करण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या  उद्यानांमध्ये आता पुरुष आणि स्त्री यांना एकत्र फिरता येणार नाही.
 
 

afgan 
 
 
पुरुषांनी बागेत फिरण्याचे दिवस वेगळे आणि स्त्रियांचे वेगळे असं ठरवून देण्यात आलं आहे. अशा नियमांमुळे अफगाणिस्तानातल्या Afghanistan स्त्री-पुरुष भेदभावात वाढ होणार आहे. "इस्लामिक अमिरातीच्या मुजाहिदीनना शस्त्रे, लष्करी गणवेश आणि वाहनांसह मनोरंजन पार्कमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही,"ते उद्यानांचे सर्व नियम आणि नियमांचे पालन करण्यास बांधील आहेत. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी ट्विटरवर सांगितले.
 
उद्यानं, बागा यामध्ये पुरुषांना बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार या चार दिवशी जाता येणार आहे. तर उर्वरित दिवशी स्त्रियांना जाता येणार आहे. गेल्या महिन्यात, तालिबान सदस्यांना त्यांची शस्त्रे मनोरंजन पार्कमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली होती, जो आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविण्यासाठी त्यांची प्रतिमा सौम्य करण्याचा आणखी एक प्रयत्न होता. ऑगस्टच्या मध्यात तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर लगेचच, त्यांच्या सैनिकांनी मनोरंजन पार्कमध्ये धिंगाणा केल्याचे फोटो समोर आले होते. ऑगस्‍टमध्‍ये सत्तेवर परत आल्‍यानंतर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानात Afghanistan कडक इस्लामिक कायदे लागू करण्‍यास सुरुवात केल्‍याचे अनेक अधिकार गटांनी सांगितले आहे.