चोरटयांनी लढविली अजब शक्कल .. सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेऊन भिंतीला भगदाड पडून लांबवीले सोने

26 Mar 2022 16:54:56
पुणे – चोर चोरी करण्यासाठी काय शक्कल लढवतील याची आपण कल्पनाच करू शकत नाही . असाच प्रकार पुणे शहरातील वारजे परिसरातील इंडिया रोडवरील लक्ष्मी माथा येथील माऊली ज्वेलर्सयेथील माऊली सराफ पेढीत घडली . चोरट्यांनी चक्क ज्वेलरी शॉपच्या शेजारी दुकान खरेदी केले. त्या दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला भगदाड पडले, त्या भगदाडातून ज्वेलरीच्या दुकानात शिरत लाखो रुपयांचे सोने गायब केले आहे. या घटनेत सुमारे 1 किलो पेक्षा अधिक दागिन्यांची चोरी झाली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

mauli jwellers 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
 
चोरटयांनी मागील काही दिवसापूर्वी चोरी झालेल्या सराफाच्या दुकानाशेजारी एक दुकान भाड्याने घेतले होते. तेथे त्यांना मसाल्याचे दुकान सुरु करायचे होते. त्यामुळे त्यांनी दुकानात फर्निचर चे काम सुरू केले होते. नवीन दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरू असल्याने चोरट्यांचा नागरिकांना संशय आला नाही. शुक्रवारी दुपारी माऊली सराफ पेढी बंद होती , याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. त्यानंतर तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. दुकानात काम सुरू असल्यामुळे भिंतीला भगदाड पाडत असल्याचा आवाज आला नाही. जरी आवाज आला तरी काम सुरू असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. दरम्यान जेव्हा ज्वेलर्सचे मालक दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेची पथके व स्थानिक पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला आहे. एक किलो पेक्षा अधिक वजनाचे दागिने दुकानातून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुकान भाड्याने घेणारे कोण आहेत ? त्यांनी ते कधी भाड्याने घेतले ? फर्निचरचे काम कोण करत होते ? नेमकी चोरी कोणी केली अशी विविध माहिती पोलिस घेत आहेत.
Powered By Sangraha 9.0