कपूर कुटुंब दुःखात कारण...
दिनांक : 26-Mar-2022
Total Views |
मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या होत्या.
ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात होतं. आता मात्र त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे.
श्रद्धा आणि रोहन हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा आणि रोहन श्रेष्ठ एकमेकांना कॉलेजपासून ओळखत आहेत. मात्र आता त्या दोघांचाही ब्रेकअप झाल्याचे बोललं जात आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
श्रद्धा आणि रोहन यांचा ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र नुकतंच श्रद्धाने गोव्यात तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रोहनने हजेरी लावली नव्हती. त्यानंतरच या चर्चांना उधाण आले होते. जानेवारी महिन्यापासूनच त्या दोघांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती. यानंतर त्या दोघांमध्ये दुरावा वाढला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.