जगभरात मोदीचा दबदबा....अनेक दिग्गजांना दिली धोबीपछाड

    दिनांक : 21-Mar-2022
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच आता अमेरिकेतील ग्लोबर लीडर अप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील नेत्यांचे अप्रूव्हल रेटिंग जाहीर केले आहेत.

 

modi 

 

यामध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवत पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. दरम्यान, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये, पंतप्रधान नरेंद मोदी Modi यांनी अथक निस्वार्थी सेवेच्या बळावरच जागतिक पातळीवर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, या शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. जगभरातील अनेक दिग्गजांना धोबीपछाड देत पंतप्रधान मोदींनी ही कमाल कामगिरी करून दाखवल्याचे बोलले जात आहे.
 

जानेवारी २०२० ते मार्च २०२२ पर्यंत या काळात हे अप्रूव्हल रेटिंग घेण्यात आले. त्यात सर्वांत लोकप्रिय जागतिक नेते म्हणून पंतप्रधान मोदीच Modi अव्वल ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट यांनी अलीकडेच यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील १३ नेत्यांना धोबीपछाड देत ७७ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह आपला नंबर अव्वल ठेवला आहे. पंतप्रधान मोदी Modi यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आहेत. त्यांना ६३ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी इटलीचे मारिया द्राघी असून, त्यांना ५४ टक्के, जपानच्या Fumio Kishida यांना ४५ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे या नेत्यांबद्दल निगेटिव्ह अप्रूव्हल रेटिंगही घेण्यात आले होते. त्यातही पंतप्रधान मोदींचे Modi अप्रूव्हल रेटिंग सर्वांत कमी म्हणजे फक्त १७ टक्के आहे. जागतिक अन्य नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग सर्वोच्च राहिले आहे. त्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना अनुक्रमे ४२ टक्के आणि ४१ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले. हे दोन्ही नेते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी राहिले. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ३३ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह सर्वात मागे आहेत.