जग तिसर्‍या महायुद्धाच्या सावटाखाली? व्लादिमीर पुतीन यांनी आखली अण्वस्त्र वापराची आखली योजना

02 Mar 2022 11:15:53
कीव्ह : सध्या जग तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली आहे, युक्रेन-रशिया चर्चा निष्फळ ठरली आहे. सहा तास चाललेली चर्चा संपुष्टात येताच रशियाने कीव्हवरील हल्ले वाढविले. युद्धविरामाची शक्यता नुसतीच विरली नाही, तर एका नव्या वृत्ताने जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र वापराची योजना आखल्याचे ते वृत्त आहे. त्यामुळं अणुयुद्धाच्या भीतीपोटी अमेरिका मित्रराष्ट्रे युक्रेनच्या मदतीकडे फिरवली पाठ आहे.
 
 
 

putin 
 
 
दरम्यान, युक्रेनवर कुठल्याही क्षणी अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, अशी भीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी वर्तविली आहे, पण पुतीन यांच्या अण्वस्त्र वापराच्या योजनेला 'स्पुत्निक' या रशियन माध्यमाने दुजोरा दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे, भरीस भर म्हणून सध्या रशियात असलेल्या अमेरिकन नागरिकांनी तत्काळ रशियाबाहेर पडावे, अशी आणीबाणीची 'अ‍ॅडव्हायझरी' बायडेन प्रशासनाने जारी केली. त्यामुळे अमेरिका आता थेट रशियावर हल्ल्याच्या तयारीत आहे की काय, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. त्यामुळं जग भयभयीत झालं असून, युक्रेनला मदत करणाऱ्या राष्ट्रांनी युक्रेनकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे कौतुक केले आहे. युक्रेनियन नागरिक मोठ्या धैर्याने आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसचे येणाऱ्या काळात रशियाला याची मोठी किंमत चुकावी लागणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने रशियासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. आम्ही रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. येणाऱ्या काळात देखील निर्बंध घालणार आहोत. मात्र आम्ही युद्धात सहभागी होणार नसल्याचे बायडन यांनी म्हटले आहे. पण यामुळं पुतीन अणवस्त्र हल्ल्याच्या तयारीत असून, ते कधीही अणवस्त्र हल्ला करु शकतात, असं बोललं जात आहे.
Powered By Sangraha 9.0