जळगाव : आंतरराष्ट्रीय चिमणी दिनानिमित्त बहिणाबाई विद्यालयात नुकतेच चिमण्यांचे घरटे कसे बनवावे याचे प्रशिक्षण डॉ. विलास नारखेडे व सामाजिक वनीकरणाचे डॉ. सैफुन शेख यांनी एका कार्यक्रमात दिली.
उन्हाळ्यात नाजूक शरीर असलेल्या चिमण्यांना पाणी, निवारा, अन्न या तिघांची गरज असते. याकरिता या कार्यशाळेचे बहिणाबाई विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांचे तर्फे घेण्यात आली. त्यात मुख्याध्यापक टी एस चौधरी आणि प्रतिभा खडके, किशोर पाटील, डॉ विलास नारखेडे, राजेश वाणी, संतोष पाटील व सामाजिक वनीकरणाचे डॉ सैफुन शेख यांनी मार्गदर्शन केले. मऊ कापूस, गवत रिकामे खोके तसेच टाकाऊ पदार्थ यांच्या उपयोगातून ही घरटी बनविण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. यावेळी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याची स्पर्धाही घेण्यात आली. चिमणी परिचयाचा पक्षी असून तो गावात घरात झाडांवर घरटे बनवतो पूर्वी चिमणी आशिया व युरोप खंडात आढळून द्यायची आता जगभरात आढळतात. पण आता शहरी भागात आधुनिकीकरण व दूरध्वनी यामुळे चिमण्यांची संख्या खूप कमी होत चालली आहे. तर यावेळी चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांचा आहार याबाबतही मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. यावेळी गजानन करवंदे, भूषण सोनवणे, चेतन मांडगे, मानसी बारी, प्रकाश सोनवणे, प्रीती सैनी, जानवी सोनार, पुनम धुंदे, रूपाली हटकर, तन्मय जगताप, हर्षाली सोनवणे इत्यादींनी सहभाग घेतला.