मिताली राजनं मोडीत काढला ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचा विक्रम, बीसीसीआयकडून शुभेच्छांचा वर्षाव

12 Mar 2022 12:55:42
ICC Womens world cup 2022: महिला विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ आज वेस्ट इंडीजविरुद्धस त्यांचा तिसरा सामना खेळत आहे. या सामन्यात मिताली राजनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.  मिताली राजनं ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचा विक्रम मोडीत काढला आहे. यासाठी बीसीसीआयकडून मिराज राजवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
 

mitali 
 
 
 
भारतीय संघात मिताली राज आणि झुलन गोस्वामी हे दोन अनुभवी खेळाडू सध्या खेळत आहेत. झुलन गोस्वामीनं न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रचला आहे.
 
मिताली राजनं विश्वचषकाच्या सर्वाधिक सामन्यात संघाचं नेतृत्व केल्याचा विक्रम आपल्या नावावर आहे. मिताली राजनं विश्वचषकात 24 सामन्या भारताचं नेतृत्व केलंय. मितालीने विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला मागे टाकले. बेलिंडा क्लार्क यांनी विश्वचषकात 23 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद संभाळलं आहे.
 
मिताली राजनं 26 जून 1999 रोजी भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तिनं आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला होता. तिनं भारतासाठी आतापर्यंत 227 एकदिवसीय सामने खेळले होते. या सामन्यात तिनं 7 हजार 663 धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतक आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतानं विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकला आहे. तर, न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 
 
प्लेईंग इलेव्हन-
 
भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.
 
वेस्ट इंडीज: डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलेने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमन.
Powered By Sangraha 9.0