४८ तासांत युक्रेन पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रशिया राष्ट्राध्यक्षांची उडाली झोप;'युद्ध जगतातला 'खली' युक्रेनच्या जमिनीवर बेस्ट स्नायपर Wali दिवसाला टिपतो ४० सैनिक

10 Mar 2022 14:59:02
Russia Ukraine  War : जगभरातून रशियाच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु झाले असून युक्रेनचे सैनिक आणि नागरिकांसह आता परदेशी नागरिक देखील युद्धात उतरू लागले आहेत. यातच रशियन सैनिकांना घाम फोडणारी बातमी समोर आली आहे.
 

wali 
 
 
जगातील सर्वात बेस्ट स्नायपर म्हणून युद्ध जगतात नावाजला गेलेल्या वलीने (Wali) युक्रेनच्या युद्धभूमीमध्ये पाय ठेवले आहेत. त्याची क्षमता एवढी प्रचंड आहे की तो एका दिवसाला ४० सैनिकांना जागच्या जागी टिपू शकतो. वली हा एक फ्रेंच-कॅनडियन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहे. त्याने अफगाणिस्तानमध्ये दोन वेळा स्पेशल ऑपरेशनमध्ये भाग घेतला होता. २००९ ते २०११ मध्ये वलीने अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. यामुळेच त्याला वली नावाची उपाधी देण्यात आली. 
 
वली हा कॅनडाच्या जॉइंट टास्क फोर्स (JTF-2) युनिटचा जवान आहे. या युनिटच्या स्नायपर्सच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. या स्नायपर्सनी साडे तीन किमीवरील लक्ष्य भेदले आहे. जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी परदेशी सैनिकांना रशियाविरुद्ध युद्धासाठी आमंत्रित केले, तेव्हा वलीने न घाबरता युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला.
 
वर्ल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने युक्रेनमध्ये येऊन मला खूप चांगले वाटत आहे. मला युक्रेनच्या लोकांना मदत करायची आहे. रशियन सैन्य युक्रेनमधील निरपराध लोकांवर बॉम्बफेक करत आहे. आठवडाभरापूर्वी मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त होतो. पण आता तो बंदूक घेऊन रणांगणात उतरलो आहे. युक्रेनच्या युद्धाचा भाग व्हावे हे पत्नीला पसंत नव्हते. पण मी कठोर निर्णय घेतला आणि इथे आलो.
 
Powered By Sangraha 9.0