उत्तर प्रदेशमध्ये फुलले कमळ ? , काय ? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी

10 Mar 2022 13:01:32
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे (BJP) सरकार येण्याची शक्यता आहे. विशेषतः देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना (Corona) मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले. मात्र, तरीही उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा एकदा योगी (Yogi) सरकार येताना दिसत आहेत. एकीकडे मोदी लाट ओसरली, याची चर्चा सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते थेट गोवा, मणिपूरपर्यंत थेट मोदी आणि मोदीच (Modi) दिसतायत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

modiji 2
 
 
 
 उत्तर प्रदेशमध्ये कमळ फुलले
 
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. या ठिकाणी आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार 273 जागा भाजपच्या खात्यात जाणार आहेत. यावरून येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असताना दिसते आहे. समाजवादी पक्षाच्या वाट्याला 119 जागा जातायत. तर बहुजन समाज पक्षाला फक्त 5 आणि काँग्रेस आणि इतरांना प्रत्येकी 3 जागा मिळतायत. लोकसभेच्या गादीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 80 जागा आहेत. येथे मोदींची जादू चालणे लोकसभेसाठी लाभदायक ठरणार आहे. उत्तराखंडमध्येही 70 पैकी 42 जागा भाजपच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. येथेही भाजप सरकार सत्तेत येऊ शकते. त्याचाही लोकसभेसाठी फायदा होणार आहे. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत.
 
गोवा, मणिपूरमध्येही बाजी
 
गोवा आणि मणिपूरनेही भाजपला तारल्याचे चित्र आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. येतथे सध्या 19 ठिकाणी भाजप येताना दिसत आहे. काँग्रेस 11, आप 2, मगोप आघाडीला 3 आणि इतरांना पाच जागा मिळतायत. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. मणिपूरमध्येही विधानसभेच्या 60 जागांपैकी 24 जागांवर भाजप येण्याची शक्यता आहे. तर 11 जागी काँग्रेस, एनपीपी 12 आणि इतर 13 जागांवर येण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही लोकसभेच्या 2 जागा आहेत. याचाही भाजपला फायदा होणार आहे. एकंदर काय तर महत्त्वाचे असे उत्तर प्रदेश भाजपने राखले आहे. देशातील सत्तेचा मार्ग तिथूनच जातो. त्यामुळे मोदींची चिंता तूर्तास तरी दूर झाली आहे .
 
https://results.eci.gov.in/ResultAcGenMar2022/partywiseresult-S05.htm 
Powered By Sangraha 9.0