पुण्यातील भिडे पूल होणार इतिहासजमा ; नदीकाठ विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन

03 Feb 2022 14:26:21
पुणे : मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सुशोभीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. टिळक पूल (पुणे महापालिकेसमोरील पूल) ते म्हात्रे पूल दरम्यानचा नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार असल्याने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे येथील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
 

bhide bridhe 
 
 
नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. भिडे पूलही लहान असल्याने तो पाडण्यात येणार आहे. वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे 11 टप्पे असून संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दोन ठिकाणी अनुक्रमे 351 कोटी आणि 600 कोटी रुपये खर्चून काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद करावे लागणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. मात्र, संबंधित भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका पर्यायी रस्ते विकसित करणार आहे.
Powered By Sangraha 9.0