आपल्या आगरी भाषेतील व्हिडीओंनी सर्वांना वेड लावणारा विनायक माळी आता स्टार झाला आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लाइक्स मिळतात. अगदी त्याचा पुढचा व्हिडीओ कधी येणार, याची चाहते आतुरतेने वाट बघतात.
युट्यूबर आणि आगरी कॉमेडियन विनायक माळी याने आता नवी कोरी अलिशान गाडी घेतली आहे. होय, विनायकने अलीकडे मर्सिडीज बेंझ सी क्लास ही अलिशान गाडी खरेदी केली.
या कारचा एक व्हिडीओ विनायकने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. 'घेतली एकदाची' असं लिहित शेअर केलेल्या या व्हिडीओतील विनायकची कार पाहून तुमचेही डोळे दिपतील.