युक्रेनमध्येही मदतीला आले गुरुद्वार अन् इस्कॉन मंदिरं (व्हिडीओ)

    दिनांक : 27-Feb-2022
Total Views |
कीव : रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरूच आहे. आता रशियन सैन्य युक्रेनच्या शहरात दाखल झाले आहे. यक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येथील गुरुद्वारे आणि इस्कॉन मंदिर गरजूंच्या मदतीला धाऊन आले आहे.
 
Iskcon
 
नुकताच येथील ट्रेनमधिल लंगरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. युक्रेन पोलंडच्या सिमेवर स्थलांतर करणाऱ्यांसाठी 'ट्रेनवरिल लंगरचा व्हिडीओ सामोर आला आहे. रविंदर सिंग (खालसा एआयडीचे संस्थापक-सीईओ) यांनी हा विडिओ ट्विट केला आहे.
 

 
 
तर 'इस्कॉन'ने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडले आहेत. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी सांगितले की, युक्रेनमधील इस्कॉन मंदिरे गरजू लोकांच्या सेवेसाठी तयार आहेत. आमचे भक्त आणि मंदिरे संकटात सापडलेल्या लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. आमच्या मंदिरांचे दरवाजे सेवेसाठी खुली आहेत. इस्कॉनची युक्रेनमध्ये ५४ पेक्षा जास्त मंदिरे आहेत आणि आमचे भक्त आणि मंदिरे इतरांना जमेल तशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. राधारमण म्हणाले, "आज सकाळी आम्हाला कीवमधील आमच्या भक्तांकडून माहिती मिळाली आणि भगवान कृष्णाच्या कृपेने ते सर्व सुरक्षित आहेत आणि आमची ५४ मंदिरेही सुरक्षित आहेत.