युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर ( रशिया-युक्रेन वादाचा परिणाम )

    दिनांक : 23-Feb-2022
Total Views |
रशिया : रशिया  आणि युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता युक्रेनमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
 

conflict 
 
 
ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे, केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, कारण याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. तसंच परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वू संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.
 
Reservists म्हणजे काय ?
 
सॅटलाईटच्या मदतीने मिळालेल्या प्रतिमांमध्ये युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्करी वाहने आणि बरेच रशियन सैन्यांचे तंबू दिसत आहेत. त्यामुळे रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेजवळ आल्याने कधीही हल्ला होण्याची चिन्ह दिसत आहेत. दुसरीकडे युक्रेनही यासाठी तयार असून त्यांनीही तयारी करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी 18 ते 60 वर्षे वयोगटातील Reservists सैन्याला किमान 1 वर्ष सेवा देण्यासाठी बोलावले आहे. Reservists म्हणजे देशामध्ये आपत्कालीन परिस्थितीत देशातील प्रत्येक नागरिकाला सैन्यात भरती होण्याची मुभा देते. या सैन्यालाच Reservists म्हणतात.