आयपीएल २०२२ च्या लिलावात बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी

02 Feb 2022 12:33:18
मुंबई:  माजी क्रिकेटर मनोज तिवारी आयपीएलच्या मेगा ऑक्शन २०२२ मध्ये शॉर्टलिस्ट झाले असून सध्या मनोज पश्चिम बंगालचे खेळ आणि युवा राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आयपीएल २०२२ चा मेगा ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारी अश्या दोन दिवशी बंगलोर येथे होणार आहे.
 

manoj tiwari 
 
त्यासाठी खेळाडूंची यादी जाहीर केली गेली आहे. एकूण ५९० खेळाडू या यादीत आहेत. त्यात २२८ कॅप्ड तर ३५५ अनकॅप्ड आहेत. ७ खेळाडू असोसिएट देशांशी संबंधित आहेत. भारतीय खेळाडूंची संख्या ३७० आहे.
 
मनोज तिवारी यांची या यादीत बेस प्राईज ५० लाख रुपये आहे. मनोज तिवारी यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला असून राजकारणात ते सध्या नवीन पारी खेळत आहेत. तृणमूलच्या तिकिटावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना मंत्रीमंडळात सामील करून त्यांच्या कडे क्रीडा आणि युवा मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. गेले काही सिझन मनोज आयपीएल खेळलेले नाहीत. पण त्याचे रेकॉर्ड पहिले तर अनेकदा त्यांनी आपल्या संघासाठी विजयी खेळी खेळली आहे. ९८ आयपीएल सामन्यात ७ अर्थशतके आणि १६९५ धावा अशी त्यांची कामगिरी आहे.
 
या आयपीएल मेगा ऑक्शन मध्ये अन्य दोन नावे सुद्धा धक्कादायक आहेत. वादग्रस्त खेळाडू श्रीसंत आणि कसोटी स्पेशालिस्ट समजला जाणारा चेतेश्वर पुजारा अशी ही दोन नावे आहेत.
Powered By Sangraha 9.0