राज्य नाट्य स्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी २१ पासून

    दिनांक : 17-Feb-2022
Total Views |
जळगाव : ६० वी राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असून जळगाव केंद्रावरील या प्राथमिक फेरीत एकूण १५ नाटकांचे सादरीकरण करण्यात येईल. 
 
d
 
या प्राथमिक फेरीत २१ फेब्रुवारी रोजी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र,दीपनगर ता. भुसावळतर्फे भगवान हिरे लिखित कूस बदलतांना हे नाटक सादर होईल. दिग्दर्शक आहेत नितीन देवरे. २२ रोजी ब्राम्हण संघ भुसावळतर्फे एक चौकोन विस्कटलेला हे बालचंद्र उखळकर लिखित आणि पंकज जोशी दिग्दर्शित नाटक सादर होईल. २३ रोजी केअर टेकर फाउंडेशन जळगाव तर्फे माणूस नावाचे बेट हे विजय तेंडुलकर लिखित आणि रमेश भोळे दिग्दर्शित नाटक सादर होईल. २४ रोजी जननायक थिएटर ग्रुप आदर्श नगर जळगावतर्फे स्टे हे सोनल चौधरी लिखित आणि दिग्दर्शित नाटक होईल. २५ रोजी कै अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव तर्फे दिशा हे नाटक होईल. लेखक शरद भालेराव असून दिग्दर्शन चिंतामण रामदास पाटील यांनी केले आहे.२६ रोजी लेवा एज्युकेशनल युनियनचे डॉ. अण्णांसाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव तर्फे फायटर (लढवय्यी) हे डॉ. जयेंद्र लेकुरवाळे लिखित आणि सुचित्रा लोंढे दिग्दर्शित नाटक होईल. २७ रोजी मनोधैर्य फाउंडेशन जळगाव तर्फे प्रदीप चुडामण भोई लिखित आणि दिग्दर्शित हेरंबा हे नाटक होईल. २८ रोजी मुळजी जेठा महाविद्यालय जळगावातर्फे ब्लडी पेजेस हे श्रीपाद देशपांडे लिखित आणि वैभव मावळे दिग्दर्शित नाटक होईल.
 
१ मार्च नाट्यभारती, इंदूरचे डहुळ हे श्रीराम जोग लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर करण्यात येईल. २ रोजी नूतन मराठा महाविद्यालय जळगावचे सेल मोबाईल आणि हे हनुमान विक्रम सुरवसे लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर होईल. ३ रोजी समर्थ बहुउद्देशीय संस्था,जवखेडे,ता एरंडोल यांचे महापात्रा हे अरविंद लिमये लिखित आणि विशाल जाधव दिग्दर्शित नाटक सादर होईल. ४ रोजी सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रतिष्ठान,जळगाव यांचे रुपाली गुंगे लिखित आणि दिग्दर्शित बळी हे नाटक सादर होईल. ५ रोजी उत्कर्ष कलाविष्कार संस्था जळगाव यांचे सोडी गेला बाबा हे अनिल कोष्टी लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर होईल. ६ रोजी वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय जळगावचे वेग्गळं असं काही तरी हे डॉ.हेमंत कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित नाटक सादर होईल. ७ रोजी युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशन जळगावचे फक्त चहा हे आकाश जनार्दन बाविस्कर लिखित आणि दिग्दर्शित नाटकाने या स्पर्धेचा समारोप होईल, असे या स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक दीपक ओंकार पाटील यांनी कळविले आहे.